Skip to main content

मराठवाडा होणार दुष्काळ मुक्त

*औरंगाबादमधून मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाचा  मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच शुभारंभ* 
   .......: मा. ना बबनराव लोणीकर

*वॉटर ग्रीडचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सादरीकरण*

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पाचे पाणी एकत्रित करून सर्व जिल्ह्यांना देण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प राबवण्यात येणार...

या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने १० हजार ५९५ कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर...

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वॉटरग्रीड प्रकल्पाचे महत्त्व मोठे  : लोणीकर

औरंगाबाद: मराठवाड्यातील जनतेचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाचा शुभारंभ लवकर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते   औरंगाबादमधून करणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्री. श्री बबनराव लोणीकर यानी सांगितले.

मराठवाडा विभागातील दुष्काळी उपाययोजना, पाणीटंचाई आणि मराठवाड्याचा कायमचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठवाडा वॉटर संदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सकाळी 11 वा विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनतर श्री. बबनराव लोणीकर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 यावेळी बैठकीला विधनसभा अध्यक्ष मा ना हरिभाऊ बागडे, आ. सुधाकर भालेराव,आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, मा आ. सुधाकर भालेराव,  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्याची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये जनावरांच्या चारा छावण्या, शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावण्या, पाण्याचे टँकर, पाणीपुरवठा योजना, दुष्काळी अनुदान वाटप इतर उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. मराठवाड्यात आज घडीला 753 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 5 लाख 24 हजार 804 जनावरांच्या चारा- पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.17 हजार 33 कोटी रु दुष्काळी निधीचे वाटप करण्यात आले आहे. विभागत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजना, पाण्याचे टैंकर, दुष्काळी अनुदान वाटपचा आढावा घेण्यात आला.
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भात काही  सूचना देण्याच्या असतील तर त्यासाठी 15 दिवस देण्यात येतील, असे लोणीकर यांनी सांगितले.

 मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम ग्रीडचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना श्री. लोणीकर यांनी दिल्या.

 मराठवाड्यातील जनतेचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाचे सादरीकरण ग्रीड यासंदर्भात मेकोरेट कंपनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी जवळपास 10 हजार 595 कोटी रुपये खर्च येणार आहे.

मेकरोट कंपनीने पिण्याचे पाणी व औद्योगिक वापरासाठी ग्रीड पद्धतीची योजना करण्याचा अहवाल सादर केला आहे. कंपनीने पिण्याचे पाणी व औद्योगिक साठी लागणारे पाणी अशी ग्रीड निर्माण करण्याचा पर्याय सुचवला आहे. 30 वर्षासाठी म्हणजे 2050 वर्षासाठी पर्यन्त पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहे. 2050 मध्ये 960 दशलक्ष घनमीटर एकूण पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये नागरी, ग्रामीण व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यात ग्रीड द्वारे अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 1330 किलोमीटर लांबीच्या मुख्य पाईपलाईनवर मराठवाड्यातील सर्व 11 धरण जोडन्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन ठिकाणापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी एकूण 3220 किलोमीटर पाईपलाईन टाकणे प्रस्तावित आहे. या पाईपलाईन पासून कोणत्याही गावाचे अंतर वीस ते पंचवीस किलोमीटर राहील,व त्यामधून सर्व गावांना गरजेच्यावेळी पाणीपुरवठा करता येणार आहे. तालुकास्तरावर पाणी पोहोचविण्यासाठी दुय्यम जलवाहिनीसाठी अंदाजे  4074 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च अंदाजीत असून यामध्ये 20 टक्के आकस्मिक खर्च व भाववाढ  1585 कोटी गृहीत धरल्यास एकूण खर्च 9015 कोटी एवढा अपेक्षित आहे यंत्रसामुग्री यासाठी अंदाजे 1080 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे, पाणीपुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी बैठकीनतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

सकारात्मक विचार करा

* हे सकारात्मक घ्या ...... * +++++ * प्रत्येक परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात अनुभवाचा अनुभव घेऊन येते * जेव्हाही आपल्या आयुष्यात कोणतीही अवांछित परिस्थिती येते जी आपल्याला हाताळता येत नाही असे वाटत असेल, घाबरू नका ... *नेहमी लक्षात ठेवा* प्रत्येक समस्या आपल्या  आपल्या जीवनात येते असतात * * समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी समाधान शोधण्यासाठी नेहमीच लक्ष केंद्रित करा * * प्रत्येक परिस्थितीत लपलेल्या आशीर्वादाने येतात * आपल्यामध्ये सर्वोत्तम आणण्यासाठी आयुष्यात समस्या येतात. केवळ अशक्तपणामुळे या आव्हानात्मक परिस्थितींना संधी म्हणून कधीही वापरण्याची संधी मिळत नाही. दुसरीकडे, * जो आपले सामर्थ्य वापरतो तो त्याच्या कमजोरपणातूनही सक्षम होतो *  * जेव्हा मी सर्व परिस्थितींचा वापर माझ्या आंतरिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वापरण्याच्या संधी म्हणून करू शकतो, तेव्हा मी माझ्या कमतरतांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकते *  हे स्वातंत्र्य मला अनावश्यक शंका आणि प्रश्नांसह मन भरल्याशिवाय या क्षणाचा आनंद घेण्याची क्षमता देते. यामुळे माझ्या जीवनात प्रगती आणण्याची क्षमता येते, ...

Ajanta Hospital Aurangabad

हळद आरोग्यासाठी उपुयक्तता

*आरोग्य सल्ला* *लेखक  : - डॉक्टर अमोल जाधव*     *हळदी चे लाडु* साहित्य ‌..एक पाव हळद एक पाव खोबरं आरदा किलो खारिक एक पाव काजु एक पाव बदाम दोन जायफळ दिड पाव साजुक तूप दि,,डपाव गुळ कृती... वरील सर्व साहित्य बारीक करून घ्या , सर्व थोडे भाजून घ्या आणि हळद तुपात भाजून घ्या नंतर उरलेले तुपात गुळ बारीक करून टाका आणि गॅसवर ठेवा गुळ  पातळ होईपर्यंत हलवत राहावे आणि या सर्व मिश्रणात मिक्स करावे आणि गरम असतानाच लाडू वळावेत कारण थंड झाल्यावर ते वळत नाही फायदा....हळदिच्या लाडू मुळे कंबर दुखी तसेच हाडांचे विकार, खोकला काही मुक्कामार लागलेला असेल किंवा शरीरावर कुठेही जखम झाली असेल, तसेच वजन नियंत्रणात राहते आणि हळद हि रक्त शुद्ध करते आणि रंग पण गोरा होतो बरं का!  जर बाळांतपणी सुरूवातीला सात दिवस जर हळदिचे लाडू खाल्ले तर बाळाला व आईला कफ होत नाही आणि आतिल व बाहेरील जखम लवकर भरून निघतात... अनुभव घेउन पहा मी बाळांतपणी पण घेतला आईने बनवले होते आणि आता पण घेत आहेत आणखी खुप फायदे आहेत... सकाळी एक लाडु खाऊन गरम पाणी किंवा गरम दुध पिले तर चांगले आरोग्य चांगले राहते......... *...